image

गृहीणी ते रणरागिणी

त्यांना खरंतर राजकारणात येण्याचा काडीमात्र इंटरेस्ट नव्हता. मदनभाऊंच्या आभाळाएवढ्या नेतृत्वापुढे, त्यांनी करून ठेवलेल्या कामापुढे मी एक गृहीणी कुठं पुरणार, कसलं राजकारण करणार या विचारानं वहीनी कधी समोर आल्याच नाहीत. पडद्यामागच्या कलाकरांसारखं त्यांनी स्वतःमधील नेतृत्वगुण पुढे आणलेच नाहीत, मदनभाऊंना घरातून एक खंबीर साथ इतपतच्याच भूमिकेत वहीनींनी समाधान मानलं होतं.... पण भाऊंच्या अचानक जाण्यानं शहराच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली, कार्यकर्ते सैरभैर झाले, भाऊंचा हा गट वहीनींकडे मोठ्या आशेने पहात होता. कालावधी लोटला वहीनींनी आपलं मन बदललं, कंबरेला पदर खोचून एका गृहीणीच्या, कुंटुंबप्रमुखाच्या भूमिकेत येऊन राजकारणात प्रवेश करत्या झाल्या. या दरम्यान सत्ता बदलली, काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, पण वहीनींनी आपल्या घराण्याची काँग्रेसची नाळ तूटू दिली नाही, काळ बदलला हळूहळू वहीनी राजकारणावर पकड मिळवित गेल्या... झालेल्या यंदाच्या लोकसभेत विशालदादांवर झालेला अन्याय पाहून मात्र त्यांच्यातील वाघीण चवताळली, सर्व राजकीय बंधने झुगारून देऊन त्यांनी ज्या हीरीरीने दादांच्या प्रचार केला त्यामुळेच सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांना दहा हत्तींचं बळ मिळून अपक्ष असूनही प्रचंड मतांनी दादा संसदेत निवडून गेले...... कार्यकर्त्यांमध्ये हे बळ आलं कुठून, तर त्याचं एकच उत्तर आहे जयश्री मदन पाटील ! वहीनींच्या पोटतिडकीच्या प्रचारानं, वहीनींचे शब्दांच्या प्रमाणिकपणाची धार येवढी तेज होती की मतदारांच्या थेट अंतःकरणाला तिने हलवून टाकलं, केवळ आपल्या सर्वांच्या साथीनं राज्यात चमत्कार घडला, आपला विशालदादा खासदार झाला ! हीच भूमिका आता पुढे नेत आपण जयश्री वहीनींना अजून मोठ्या जबाबदारीत अडकवायचं आहे. त्यांची विधानसभेत पाठवणी करून हक्कानं आपली कामं, आपल्या शहराचा विकास घडवायचा आहे. चला तर ही परिवर्तनाची लाट विधानभवनापर्यंत थडकवू, वहीनींना साथ देऊन, मदनभाऊंवर झालेल्या अन्यायाचा पैरा फेडू !

पूर्ण नाव

जयश्री मदन पाटील


जन्म

५ फेब्रुवारी १९६४


शिक्षण

बी.ए (एल.एल.बी. दोन वर्षे पूर्ण)


अध्यक्ष : वसंतदादा पाटील दंत महाविद्यालय आणि रूग्णालय, कवलापूर - सांगली

उपाध्यक्ष : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, सांगली

अध्यक्ष : मदनभाऊ पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, कवलापूर - सांगली

अध्यक्ष : मदनभाऊ पाटील मेमोरियल हॉस्पीटल, कवलापूर - सांगली

सदस्य : दि महाराष्ट्र स्टेट को ऑप, हौसिंग फायनान्स लि, मुंबई

सदस्य : अखिल भारतीय कॉग्रेस आय कमिटी, नवी दिल्ली

अध्यक्ष : शिवाजीनगर शिक्षण संस्था, सांगली

अध्यक्ष : सर्वोदय शिक्षण संस्था, सांगली

अध्यक्ष : विश्व विजय शिक्षण मंडळ, सांगली

माजी संचालक : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली

संचालक : विष्णुआण्णा पाटील सहकारी खरेदी विक्रि संघ लि, सांगली

अध्यक्ष : सांगली जिल्हा हॅन्डवॉल असोशिएशन, सांगली

माजी सदस्य : महाराष्ट्र राज्य कव्वडी असोशिएशन, मुंवई

अध्यक्ष : वसंतदादा विकास प्रतिष्ठान,

अध्यक्ष : शिवशक्ती व्यायाम मंडळ, सांगली